न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ डिसेंबर २०१९) :- पिंपरी चिचवड शहर जिल्हा युवक काँग्रेस शिष्टमंडळाने आज दिव्यांग विद्यार्थ्यासोबत महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांची भेट घेतली व दिव्यांगासाठी असलेल्या नियमावलीत बदल करत विद्यार्थ्यांच्या बस पास संदर्भात असलेल्या कागदोपत्री अडचणी दूर करण्याबाबत निवेदन देण्यात आले.
याबाबत दिलेल्या निवेदनात, पिंपरी चिचंवड महानगरपालिका अपंग कल्याणकारी योजने अंतर्गत नागरवस्ती विभाग व पी एम पी एम एल कडून सन २०११ पासून देण्यात येत असलेल्या दिव्यांग विद्यार्थी बस पास सवलती साठी आपल्या नागरवस्ती विभागाकडून घेण्यात येत असलेल्या अतिरिक्त कागद पत्रां च्या मागणी मुळे अनेक विद्यार्थ्यांना अत्यावश्यक असणारी बस पास सवलत नाकारली जात आहे या बाबत दिव्यांग बांधवांकडून तक्रारी प्राप्त होत आहेत.
नागरवस्ती विभागाकडून मागणी होत असलेले रहिवासी पुराव्याबाबतचे रेशन कार्ड, लाईट बिल व नोटरी-शपथपत्र न मागता संबंधित विद्यार्थ्यांचे संगोपन करणा-या संस्थेचे पत्र, काॅलेजचे बोनाफाईड, ओळखपत्र किंवा नोकरी करत असल्यास कंपनीचे ओळखपत्र ग्राह्य धरून बस पास मिळावेत हि प्रमुख मागणी करण्यात आली आहे.
यावर सकारात्मक प्रतिसाद देत अतिरिक्त आयुक्त पाटील यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांसमवेत संवाद साधत अडचणी समजावून घेतल्या. या प्रसंगी युवक काँग्रेस चे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, शहर युवक काँग्रेस सरचिटणीस निखिल भोईर, युनूस बागवान, सिध्दार्थ वानखेडे, पिपंरी विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष चे हिराचंद जाधव,अनिल सोनकांबळे, सुभाष वाघमारे व दिव्यांग विद्यार्थी गीतेश चौधरी, बळीराम धराडे, बालाजी सुर्यवंशी, शंकर भोईटे व शिवकुमार कांबळे आदी उपस्थित होते.















