न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ डिसेंबर २०१९) :- देहूरोड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जवळपास एक लाख अनुयायांनी आज महाबुद्धवंदना म्हटली. येथील भव्य अशा पटांगणात असंख्य अनुयायी पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करून रांगेत बसलेले होते. त्यामुळे देहूरोड येथील वातावरण बुद्धमय झाले होते.
२५ डिसेंबर १९५४ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देहूरोड येथे भगवान बुद्धांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली होती. या ऐतिहासीक दिवसाला आज ६५ वर्ष पुर्ण झाली आहेत. या निमित्त जवळपास एक लाख अनुयायीनी महाबुद्धवंदना म्हटली.












