न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ डिसेंबर २०१९) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या त्याचप्रमाणे विविध विकास कामांसाठी येणा-या सुमारे ९२ कोटी ५३ लाख ८४ हजार इतक्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. स्थायी समिती सभागृहात आज झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी विलास मडीगेरी होते.
विद्युत विभागासाठी आवश्यक विविध पोल्स साहित्य खरेदीकामी येणाऱ्या ५१ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. नागरवस्ती विकास योजना विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या दिव्यांग कल्याणकारी योजने अंतर्गत बाळाचे प्रसुतीपुर्व अपंगत्व ओळखण्यासाठी गर्भवती महिलांची व प्रसुतीपश्चात नवजात बालकांची तपासणी करणेकामी येणाऱ्या ७१ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. कासारवाडी मैलाशुद्धीकरण केंद्राअंतर्गत प्रभाग क्र. ४ मधील दिघी मधील गणेश नगर परिसरातील मलनि:सारण नलिकेचे सुधारणा करणेकामी येणाऱ्या ३१ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. कासारवाडी मैलाशुद्धीकरण केंद्राअंतर्गत प्रभाग क्र. ६ मधील चक्रपाणी वसाहत व उर्वरीत परिसरात आवश्यकेतुनसार ड्रेनेज लाईन बदलणेकामी येणाऱ्या ३७ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.
इ प्रभागाअंतर्गत सेक्टर २३ ते सेक्टर ७/१० व गवळीमाथा पर्यंतच्या ग्रॅव्हीटी लाईनची दुरूस्ती विषयक कामे येणाऱ्या २९ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. विद्युत विभागाकडील कामांसाठी १ कोटी २७ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता
देण्यात आली. से.क्र.२३ निगडी येथील जलशुद्धीकरण केंद्र टप्पा क्र.१,२,३ व ४ मधील विविध युनिट्स साठी उपलब्ध असलेले वाल्व्ह व इतर अनुषंगिक कामे करणेकामी येणाऱ्या ७५ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.
चऱ्होली मैलाशुद्धीकरण केंद्राअंतर्गत प्रभाग क्र.३ मधील मोशी गावठाण व शिवाजीवाडी परिसरात मलनि:सारण विषयक कामे करणेकामी येणाऱ्या २८ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. ब क्षेत्रीय कार्यालयाअंर्गत प्र.क्र.१७ मध्ये जलनि:सारण विषयक दुरूस्तीची कामे करणेकामी येणाऱ्या ३२ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. कासारवाडी मैलाशुद्धीकरण केंद्राअंतर्गत प्रभाग क्र. ७ मधील गव्हाणे वस्ती व आदिनाथ नगर
परिसरातील मलवाहिनी सुधारणा कामे करणेकामी येणाऱ्या २६ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. इ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत प्रभाग क्र.४ मधील ड्रेनेज लाईन व चेंबर्सची वार्षिक ठेकेदारी पद्धतीने देखभाल व दुरूस्ती करणेकामी येणाऱ्या २५ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. कासारवाडी मैलाशुद्धीकरण केंद्राअंतर्गत प्रभाग क्र. ४ मधील दिघी मधील दत्तनगर परिसरात मलनि:सारण विषयक कामे करणेकामी येणाऱ्या २७ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.
कासारवाडी मैलाशुद्धीकरण केंद्राअंतर्गत प्रभाग क्र. ५ मधील श्रीराम कॉलनी, चक्रपाणी वसाहत रोड परिसरामध्ये मलवाहिनी सुधारणा कामे करणेकामी येणाऱ्या २६ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. कासारवाडी मैलाशुद्धीकरण केंद्राअंतर्गत प्रभाग क्र. ७ मधील लांडेवाडी, विकास कॉलनी, शांतीनगर परिसरातील मलवाहिनी सुधारणा कामे करणेकामी येणाऱ्या २८ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. भाटनगर मैलाशुद्धीकरण केंद्राअंतर्गत प्रभाग क्र. २० मधील पिंपरी स्टेशन रस्ता व उर्वरित ठिकाणी तसेच आवश्यक त्या ठिकाणी ड्रेनेज व्यवस्थेमध्ये सुधारणा कामे करणेकामी येणाऱ्या ३५ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. कासारवाडी मैलाशुद्धीकरण केंद्राअंतर्गत प्रभाग क्र.५ मधील संत ज्ञानेश्वर नगर,शास्त्रीचौक परिसरामध्ये मलवाहिनी सुधारणा कामे करणेकामी येणाऱ्या ३३ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.
प्रभाग क्र.९ मधील उद्यमनगर येथील उद्यानात विरंगुळा केंद्र बांधणे व इतर कामे करणेकामी येणाऱ्या ५२ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र. १० मधील बर्ड व्हॅली उद्यानाची स्थापत्य विषयक कामे करणेकामी येणाऱ्या ६४ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र. २२ काळेवाडी ज्योतिबा उद्यानात स्थापत्य विषयक कामे करणेकामी येणाऱ्या २५ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र.१५ मध्ये महात्मा बसवेश्वर पूतळा उभारणे व अनुषंगिक कामे करणेकामी येणाऱ्या ६२ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र.२० संत तुकारामनगर येथील अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण करणेकामी येणाऱ्या ४१ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र.११ मधील शरदनगर नेवाळेवस्ती, हरगुडेवस्ती व इतर परिसरातील स्थापत्यविषयक किरकोळ देखभाल दुरूस्तीची कामे करणेकामी येणाऱ्या २६ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.
प्रभाग क्र.१३ येथील खोदाई करणेत आलेले रस्ते डांबरीकरण करणेकामी येणाऱ्या २७ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र.११ मधील डांबरी रस्त्याची दुरूस्ती करणेकामी येणाऱ्या २९ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र.१ चिखली येथील टॉवरलाईन रोड व इतर रस्त्यांचे हाँटमिक्स पद्धतीने डांबरीकरण करणेकामी येणाऱ्या ३२ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र.१ चिखली येथील संगम हौ सोसायटी दत्त हौ सोसा नारायण हौ सोसा विठ्ठल रख्मीनी परीसर व राजगड पार्क व इतर परिसरातील रस्त्यांचे हॉटमिक्स पद्धतीने डांबरीकरण करणेकामी येणाऱ्या ३१ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र.१२ तळवडे रूपीनगर मधील चौकाचे सुशोभिकरण करणे व स्थापत्य विषयक कामे करणेकामी येणाऱ्या २९ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.
प्रभाग क्र.११ मधील नेवाळेवस्ती, हरगुडेवस्ती, पवारवस्ती व इतर परिसरातील रस्त्यांची देखभाल दुरूस्तीची कामे करणेकामी येणाऱ्या २६ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. ब प्रभागाअंतर्गत विविध ठिकाणी दिव्यांगासाठी स्थापत्य विषयक सोयी सुविधा पूरविणेकामी येणाऱ्या ४२ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र. २४ मधील पवारनगर चौक ते थेरगाव फाटा २४.०० मी.रूद रस्त्याचे सुशोभिकरणाची कामे करणेकामी येणाऱ्या ४ कोटी ७१ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवेतील व सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी यांचेसाठी विमा योजना लागू करणेसाठी येणाऱ्या २७ कोटी ८४ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रात सी.एस.आर Activity राबविणेचे कामकाजासाठी येणाऱ्या ३० लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. मोशी कचरा डेपो येथे दिवाबत्ती व अनुषंगिक कामे करणेकामी येणाऱ्या ३३ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र.१ चिखली येथील साने कॉलनी श्रीगणेश ज्ञानेश्वरी कृष्णाई प्राजक्ता व साने इंडस्ट्रीज परिसरातील रस्त्याचे हाँटमिक्स पद्धतीने डांबरीकरण करणेकामी येणाऱ्या २७ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.
प्रभाग क्र.११ मध्ये विविध ठिकाणी हाँटमिक्स पद्धतीने देखभाल व दुरूस्तीची कामे करणेकामी येणाऱ्या ३० लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र.२५ पुनावळे व प्रभागातील इतर परिसरातील हाँटमिक्स पद्धतीने देखभाल डांबरीकरण करणेकामी येणाऱ्या ४२ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र. ६ मधील चक्रपाणी वसाहत व परिसरातील उर्वरित रस्त्यांची डांबरीकरणाने सुधारणा करणेकामी येणाऱ्या ४१ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र.२० येथील कासारवाडी मधील विविध रस्ते विकसित करणेकामी येणाऱ्या २ कोटी ८२ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र.२२ काळेवाडी कोकणेनगर येथील मज्जीद रोड व पवना चौक ते तपकीर मळा चौक, अभियंता कॉलनी संत ज्ञानेश्वर कॉलनी रस्त्यांचे डांबरीकरण/काँक्रीटकरण करणेकामी येणाऱ्या ८० लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र.१२ रुपीनगर तळवडे पसिसरातील अस्तीत्वातील रस्ते विकसित करणेकमी येणाऱ्या ५४ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.
प्रभाग क्र.१२ त्रिवेणीनगर, सहयोगनगर परिसरातील अस्तीत्वातील रस्ते विकसित करणेकामी येणाऱ्या ४८ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र.११ मधील विविध ठिकाणी २४×७ अंतर्गत खोदलेल्या रस्त्यांचे डांबरीकरण करणेकामी येणाऱ्या ५३ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र.११ मधील विविध ठिकाणी २४×७ अंतर्गत खोदलेल्या रस्त्यांचे डांबरीकरण करणेकामी येणाऱ्या ३५ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र.११ मधील नेवाळेवस्ती, हरगुडेवस्ती, पवारवस्ती इत्यादी ठिकाणाचे रस्त्यांचे डांबरीकरण करणेकामी येणाऱ्या ८९ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र.१२ ज्योतिबानगर परिसरातील अस्तित्वातील रस्ते विकसित करणेकामी येणाऱ्या ५३ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र.२० येथील एम.आय.डी.सी परिसरातील अस्तीत्वातील रस्ते विकसित करणेकामी येणाऱ्या ५ कोटी ४ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.












