- न्यू सिटीप्राईड इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ जानेवारी २०१९) :- रहाटणीतील क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फौंडेशन संचालित न्यू सिटीप्राईड इंग्लिश मिडीयम स्कूल यांच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस संस्थापक अरुण चाबूकस्वार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी संस्थेचे संस्थापक अरुण चाबूकस्वार, भगवान गोडांबे (सा. कार्यकर्ते) शिवसेना चिंचवड विधानसभा संघटीका अनिता तुतारे, शिल्पा आनपण, श्वेता कापसे, नीता डॉन, कमल गोडांबे, वंदना खंडागळे, माछेन्द्र देशमुख,सुदर्शन देसळ, राजेश गायकवाड (सा. कार्यकर्ते), दत्ता बनसोडे (सा. कार्यकर्ते) तसेच शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, पालक उपस्थित होते.
अरुण चाबुकस्वार म्हणाले की, “राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंसारख्या महावृक्षाच्या सावलीत सावित्रीमाईंची वाढ खुंटली नाही, उलट अधिक बहरली. स्त्रीने ठरविले तर तिच्यासाठी काहीही अशक्य नाही, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सावित्रीमाई फुले होय.
सावित्रीमाई धाडसाचा पर्वत होत्या. त्यांनी राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंच्या निधनानंतरही सत्यशोधक समाजाचे कार्य आपल्या अंतापर्यंत सुरु ठेवले. आयुष्यातील सर्व संकटांना त्यांनी निर्धाराने हरविले आहे. सावित्रीमाईंच्या त्यागाची महिलांनी जाण ठेवावी” असे भगवान गोडांबे म्हटले.
यावेळी शाळेतील शिक्षकांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. विद्यार्थीनी प्रणिता जाधव हिने सूत्रसंचालन केले तर, रंजिता महातो यांनी पाहुण्याचे आभार मानले.