न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ जानेवारी २०१९) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने शहरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा धडाका लावला आहे.
महापालिकेचे कार्यकारी अभियंता राजेंद्र राणे यांच्या मार्गदर्शनाखाली चिखली परिसरातील नायर कॉलनी, गणेश हौसिंग सोसायटी, मनीषा कॉलनी, आंगन वाडी, सहयोग, मोरया कॉलनी, गुरुकृपा, गोकुळ, स्वप्न नगरी, कुंज, सरकार चौक, नंदनवन, पेंढारकर चौक, मोरे वस्ती, टॉवर लाईन खालील रस्त्याच्या कडेला दुकानापुढील व घरापुढील वाढीव अनधिकृत बांधकामे निष्कासित केले.
यात २८ पत्राशेड, ३७ ओटे, १० नहानी घर, १३ वाढीव बांधकाम, ४ पडवी पाडण्यात आल्या. ही कारवाई अनधिकृत बांधकाम विभाग व पथक ३ च्या कर्मचारी अधिकारी यांनी केली. कारवाईसाठी मनपाचे १५ स्थानिक पोलीस, दोन जेसीबी वापरले.
तसेच (दि. ६) रोजी मॅगझिन्स चौक ते च-होली फाटा, दिघी आळंदी रस्ता, साई मंदिर, वडमुखवाडी इत्यादि परिसरात कार्यकारी अभियंता राजेंद्र राणे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण हटाव कारवाई करून साहित्य जप्त करण्यात आले व मनपाचे गोडाऊनमध्ये जमा केले.
यात हातगाडय़ा ५, लोखंडी टपरी ६, प्लास्टिक क्रेट १५, प्लास्टिक स्टूल ५, टेम्पो १, लो. जाहिरात फलक १०, लोखंडी टेबल १, लाकडी टेबल १, लाकडी खोक १, जुने प्लाइवुड २. ही कारवाई पथक क्रमांक ३ द्वारे करण्यात आली. कारवाई साठी मनपाचे १० पोलीस, ठेकेदारकडील १ क्रेन, ४ डंपर, ४ मजुर होते. कारवाई दरम्यान स्थानिक पातळीवर विरोध झाला. तथापि पोलिसांच्या मदतीने विरोध मोडून कारवाई पूर्ण केली, अशी माहिती प्रभारी प्रशासन अधिकारी सुरेश कोंढरे यांनी दिली.















