न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ जानेवारी २०१९) :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाचे खातेवाटप झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी जिल्हानिहाय पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या आज बुधवारी जाहीर केल्या आहेत.
अपेक्षेप्रमाणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती झाली आहे. मागील सत्ताकाळातील दहा वर्षे अजित पवार यांनी पालकमंत्रीपदाची जबाबदारी पार पडली आहे.














