शिक्षण हे समाज परिवर्तनाचे सर्वांत मोठे साधन. गेल्या दोन दशकांत पिंपरी-चिंचवडमधील शैक्षणिक वातावरण सकारात्मकदृष्ट्या पूर्णपणे बदलले. शिक्षण ‘स्मार्ट’होण्यासाठी शिक्षण संस्थांनीही पुढाकार घेतला. या पुढाकारात चिंचवड येथील औद्योगिक शिक्षण मंडळ ही, संस्थांही मागे नाही. शैक्षणिक क्षेत्रातील उणीव भरून काढण्यासाठी १९८३ साली औद्योगिक शिक्षण मंडळ (एएसएम) या संस्थेची स्थापना झाली. आज आधुनिक शिक्षण क्षेत्रातील गेल्या तीन दशकांहून अधिकचा अनुभव या संस्थेकडे आहे. संस्थेच्या माध्यमातून संस्थेचे अध्यक्ष संदीप पाचपांडे सर यांनी दृढ आत्मविश्वासाच्या जोरावर शिक्षण क्षेत्रात क्रांतीच घडवून आणली.
एएसएम या संस्थेत कार्पोरेट जगतातील माहिती व तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण अभ्यासक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमधील नेतृत्व गुण विकसीत करण्यावर भर दिला जातो. त्यामुळेच एएसएमने सातत्याने भारतातील पहिल्या क्रमांकाच्या बी-स्कूलमध्ये स्थान मिळवले. त्यामुळेच एएसएम ग्रुप ऑफ इन्स्टीट्युटला ‘९ व्या उच्च शिक्षण आणि मानव संसाधन परिषदे’ चा ”बेस्ट स्कूल” हा पुरस्कार मिळाला.
‘डिजिटल’ युगामुळे शिक्षणाची दिशा बदलून गेल्याने शहरातील शैक्षणिक क्षेत्रात झपाट्याने बदल झाले आहेत. आज पिंपरी-चिंचवड शैक्षणिकदृष्ट्या एका वेगळ्या टप्प्यावर येऊन उभे ठाकले आहे. आम्ही घडवलेला विद्यार्थी दर्जेदार आणि उत्तम कला गुणांनी संपन्न असणारच, असा विश्वास निर्माण करणारी शिक्षण पध्दती आम्ही आमलात आणली आहे.
-एएसएम ग्रुप ऑफ इन्स्टीट्युटचे चेअरमन डॉ. संदीप पाचपांडे.
‘बेस्ट स्कूल’ चा किताब स्वीकारताना एएसएम ग्रुप ऑफ इन्स्टीट्युटचे डॉ. संदीप पाचपांडे.















