न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० जानेवारी २०२०) :- गोरगरिबांना घरकुल मिळावे यासाठी कष्टकरी कामगार पंचायत अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांनी रस्त्यावर उतरून लढा दिला आणि यशस्वी पाठपुरवठा केला आहे. यामुळे दोन हजार पेक्षा अधिक रिक्षाचालकांना चिखली येथील घरकुल प्रकल्पामध्ये हक्काचे आणि स्वतःचे घरकुल मिळाले आहे. तसेच घरकुल मध्ये राहणाऱ्या रिक्षा चालकांना घरकुल मध्ये नवीन रिक्षा स्टँड देखील स्थापन झाले आहे, असे मत घरकुल मध्ये राहणाऱ्या रिक्षाचालकांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र रिक्षा पंचायत घरकुल रिक्षांचे नुकतेच माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी कष्टकरी कामगार पंचायत कोषाध्यक्ष प्रल्हाद कांबळे, स्वामी समर्थ जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष हरिनारायण शेळके व सम्यक क्रांती संघ चे अध्यक्ष दशरथ शिंदे उपस्थित होते.
स्टॅन्ड अध्यक्ष सुरेश आठवले, कार्याध्यक्ष अनिल गोरखे, सचिव लक्ष्मण भोर, उपाध्यक्ष गजानन पाबळकर, खजिनदार संदिप जाधव,ईस्माईल शेख, पोपट काशिद,भगवान लंघे, तुकाराम देवकते, धिरज सुर्यवंशी, संतोष धुमाळ,ईश्वर पाटील,अजित सोट यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. कार्यक्रमाचे सुत्र संचालन बाळू चंदनशिवे यांनी केले. आभार संदिप जाधव यांनी मानले. रिक्षा चालक व मालक मोठया संख्येने उपस्थीत होते.












