न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० जानेवारी २०२०) :- आरोपी जाधव राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पुणे कार्यालयात कर्मचारी आहे. फिर्यादी पौळ हे त्यांचे मित्र दादा चव्हाण, कुमार गजानन खडसे, दादा भानुदास गायकवाड यांच्यासोबत ओटास्कीम येथे शेकोटी करून बसले होते. त्यावेळी आरोपी जाधव तेथे आला. त्याने फिर्यादी यांना आधारकार्डबाबत विचारले.
आमच्याकडे आधारकार्ड नसल्याचे फिर्यादी यांनी सांगितले. त्यानंतर आरोपी जाधव याने फिर्यादी व चव्हाण, खडसे व गायकवाड यांना लाकडी काठीने मारहाण केली. यात फिर्यादी यांच्या हाताच्या करंगळीला दुखापत झाली, असे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत गुरुवारी (दि. ९) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विश्वनाथ गणपत पौळ (वय ५५, मिलींदनगर, ओटास्किम, निगडी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, गणेश जाधव (वय ४२) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.












