शहर मनसेच्यावतीने नव्याने स्थापन झालेल्या पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे नवनियुक्त पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांना मनसे शिष्टमंळाच्या वतीने भेटुन शुभेच्छा देण्यात आल्या. शहर कायदा व सुरक्षितेकरिता मनसे प्रशासनास नेहमीच मदत करत आली आहे. पोलीस आयुक्तालयाची स्थापना झाल्यामुळे शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यास आणखी मदत होईल असे मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी आपले मत व्यक्त केले व आयुक्तांना शुभेच्या दिल्या.
यावेळी मनसे सरचिटणीस किशोरभाऊ शिंदे, महा. राज्य उपाध्यक्ष गणेश आप्पा सातपुते, उपशहराध्यक्ष, अंकुश आप्पा तापकीर, राजुभाऊ सावळे, बाळा दानवले, शहर सचिव रूपेशभाऊ पटेकर, महिला शहराध्यक्षा, अश्वीनीताई बांगर, शहर सचिव, सिमाताई बेलापुरकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.












