न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० जानेवारी २०१९) :- खासगी वाटाघाटीने भूसंपादन करून मोबादला देण्याच्या प्रक्रियेत बदल करण्याच्या प्रस्तावामुळे भाजपमधील नगरसेवकांमध्येच दोन गट पडले आहेत.
मोबदला देण्याच्या प्रक्रियेतील बदलामुळे अनेकांना नुकसान होणार आहे. त्यामुळे हा विषय सलग दुसऱ्यांदा तहकूब करण्यात आला आहे. महापालिकेची जानेवारी महिन्याची सर्वसाधारण सभा आज सोमवारी पार पडली.
महापौर माई ढोरे महासभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. २० नोव्हेंबर २०१५ नंतर भूखंडाचे तुकडे केलेल्या मिळकतधारकांना सांत्वना रक्कम ३० टक्के इतकीच देण्याच्या प्रस्तावाला भाजपच्याच अर्ध्याहून अधिक नगरसेवकांचा विरोध आहे. त्यामुळे पुन्हा एकदा हा प्रस्ताव तीन महिन्यांसाठी तहकूब करण्यात आला आहे.