न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० जानेवारी २०१९) :- भरधाव वेगातील एसटीच्या शिवनेरी बसने दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून, दुचाकीवरील महिलेचा मृत्यू झाला आहे. ही घटना रविवारी (दि. १९) रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास वाकड ब्रिजजवळ एका हॉस्पिटलसमोर घडली.
अश्विनी तानाजी मुरुडकर असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तर तानाजी पोपटराव मुरुडकर (वय २८, रा . भोसरी ) हे या अपघातात जखमी झाले असून त्यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बसचालक रवींद्र विठ्ठल जाधव (रा. शिरढोण, ता. कोरेगाव, जि. सातारा) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.