न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ जानेवारी २०१९) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागामार्फत आज गुरुवारी (दि. २३) रोजी ‘ क ‘ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत प्रभाग क्र. ०२ बो-हाडेवाडी, मोशी व प्राधिकरण येथील अनधिकृत १०० पत्राशेड, टपऱ्या, हातगाड्या निष्कासित करण्यात आल्या.
या कारवाईमध्ये अंदाचे १२००० चौ. फूट क्षेत्र पाडण्यात आले तसेच २० हातगाड्या / टपऱ्या जप्त करण्यात आल्या. सदर कारवाई अतिरिक्त आयुक्त अजित पवार व सह शहर अभियंता राजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अभियंता राजेंद्र राणे यांच्या अधिपत्याखाली केली.
यात महानगरपालिका अतिक्रमण पथक, पोलीस उपनिरीक्षक, ०२ पोलीस पुरुष १५, व पोलीस महिला ०७, क्रेन ०२, डंपर ६, जे.सी.बी. ०१, वायरमन ०१, विडिओग्राफर ०१, मनपा कर्मचारी व मजूर कारवाईसाठी उपस्थितीत होते, अशी माहिती प्रभारी प्रशासन अधिकारी सुरेश कोंढरे यांनी दिली.















