न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ जानेवारी २०१९) :- पिंपरी चिंचवड महापालिकेचे ‘ब’ क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत प्रभाग क्र. १६ येथील किवळे, मामुर्डी येथे आज बुधवारी (दि. २२) रोजी महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने अनधिकृत बांधकामावर कारवाई केली.
सदर कारवाईमध्ये आर. सी. सी. ०४, जोते बांधकाम ०२ निष्कासित करण्यात आले. सदर अनधिकृत बांधकामाचे एकुण क्षेत्रफळ ७३९२.१२ चौ. फुट बांधकाम (६८७ चौ. मी.) इतके आहे.
ही कारवाई कार्यकारी अभियंता सतिश इंगळे यांचे मार्गदर्शनाखाली, उप-अभियंता अनिल शिंदे, कनिष्ठ अभियंता व बीट निरीक्षक यांचे पथकाने केली. ०२ जेसीबी, ०१ ब्रेकर व ०५ मजुर, मनपाकडील १५ पोलीस, होमगार्ड व देहूरोड पोलीस स्टेशन येथील ०१ पोलीस उपनिरीक्षक, २ कर्मचारी तसेच मनपाकडील अतिक्रमणाचे ०१ वाहन यांच्या बंदोबस्तामध्ये कारवाई करण्यात आली.















