- प्रजासत्ताकदिनी महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात ध्वजारोहण…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ जानेवारी २०१९) :- आपण साजरा करित असलेला प्रजासत्ताक दिन हा लोकशाहीचा उत्सव असून विविध प्रयत्नांमुळे आपली लोकशाही मजबूत होत आहे, असे मत महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी व्यक्त केले.
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७० व्या वर्धापनदिनानिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी उपमहापौर तुषार हिंगे, स्थायी समिती सभापती विलास मडीगेरी, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, आयुक्त श्रावण हर्डीकर, अपक्ष आघाडी गटनेते कैलास बारणे, अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, ब प्रभाग अध्यक्षा करुणा चिंचवडे, नगरसदस्य योगेश बहल,राजेंद्र गावडे, शैलेश मोरे, राजू मिसाळ, अमित गावडे, नगरसदस्या अनुराधा गोरखे, अपर्णा डोके, मीनल यादव, स्वीकृत सदस्य भाऊसाहेब भोईर, बाबू नायर, माजी नगरसदस्य विजय लांडे, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, अजित पवार, शहर अभियंता राजन पाटील, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय, अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, सहाय्यक आयुक्त आशादेवी दुरगुडे, चंद्रकांत इंदलकर, मनोज लोणकर, मंगेश चितळे, स्मिता झगडे, अण्णा बोदडे, संदिप खोत, प्रभावती गाडेकर, मुख्य अग्निशमन अधिकारी किरण गावडे, सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, प्रशासन अधिकारी राजेश आगळे आदी मान्यवर उपस्थित होते.
महापौर उषा उर्फ माई ढोरे म्हणाल्या, लोकशाही विकेंद्रीकरणाची कास धरणा-या महात्मा गांधींचे १५० वे जयंती वर्ष झाले आहे. तर त्यांच्या स्वप्नांची पूर्तता करणा-या ७३ व ७४ व्या घटना दुरुस्तीचे २६ वे वर्ष आहे. हे लक्षात घेता यापुढे होणा-या सर्व निवडणुकांमध्ये मतदारांनी राष्ट्रीय कर्तव्य भावनेतून सहभाग घेणे आवश्यक आहे. तसेच स्वतः बरोबर इतर सहका-यांनाही मतदानाच्या कर्तव्यासाठी प्रोत्साहित करणे आवश्यक आहे. २६ जानेवारी ते १० फेब्रुवारी २०२० दरम्यान राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लोकशाही पंधरवडा आयोजित केला असून त्याचा शुभारंभ झाल्याचे त्यांनी जाहीर केले. मनपातर्फे लोकशाही पंधरवड्यानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचेही त्या म्हणाल्या.












