न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ जानेवारी २०१९) :- युगांडा येथून शिक्षणासाठी आलेली ३३ वर्षीय महिला ही पिंपळे गुरव परिसरात लिव्ह-इन रिलेशनशिप मध्ये एका व्यक्ती सोबत राहात होती. फ्रेड बोहो हा या महिलेची छेड काढत असे. गेल्या सहा महिन्यांपासून पीडितेशी बोलण्याचा प्रयत्न करत होता. मात्र ३३ वर्षीय महिला ही बोलण्यास टाळाटाळ करत होती.
याच रागातून रस्त्यात या दोघांचे भांडण झाले. बोहोच्या रागाचा पारा चढला आणि त्याने या महिलेच्या पोटावर लाथ मारली. ज्यानंतर या महिलेचा गर्भपात झाला. आरोपी बोहोला संबंधित महिला ही चार महिन्याची गर्भवती होती अशी माहिती होती. तरीही बोहोने जाणीवपूर्वक या महिलेच्या पोटावर लाथ मारली आहे.
फ्रेड बोहो वय-४० रा. पिंपळे गुरव मूळ- नायजेरियन) असे आरोपी चे नाव आहे. फ्रेडला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहेत.












