न्यूज पीसीएमसी नेटवर्क
बुधवार (दि. २९ जानेवारी २०१९) :- २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त अभिनव रावेत सोशल फाऊंडेशन व प्रोबो प्राईड कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने रावेत परिसरातील प्रोबो प्राईड हौ. सो. येथे मोफत नेत्र चिकित्सा शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी शहर मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले, अनिकेत प्रभु, प्रविण माळी, राहुल कलाटे, योगेश शिंदे, युसुफ खान, गणोश लोंढे, अक्षय नाळे, हेमंत डांगे, प्रतिक शिंदे आदी उपस्थित होते. .
परिसरातील १०० ते १५० नागरिकांनी या शिबीरात सहभाग घेत नेत्र चिकित्सा केली. या शिबिरास नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. डॉ. सौरभ चावरे यांचे या शिबिरास विशेष सहकार्य लाभले.