न्यूज पीसीएमसी नेटवर्क
बुधवार (दि. २९ जानेवारी २०१९) :- पुण्यातील मार्केट यार्डमधील हॉटेल समाधानमध्ये शिवभोजन सुरू करण्यात आले आहे. राज्य सरकारची शिवभोजनासाठी थाळ्यांची मर्यादा असली तरी त्याला अनेक ठिकाणांहून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
मंगळवारी शिवभोजन थाळीसाठी अनेक लोक आल्यानं गोंधळ आणि हाणामारी झाल्याचा प्रकार घडला होता. त्यामुळे पुन्हा असा प्रकार घडू नये यासाठी पोलिसांच्या बंदोबस्तात शिवभोजन थाळीचं वितरण करण्यात आलं.
नवीन आर्थिक वर्षांपासून म्हणजेच एप्रिलपासून योजनेची व्याप्ती वाढवत रोज एक लाख जणांना शिवभोजनाचा लाभ देण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. त्यासाठी महाविकास आघाडी सरकारने तयारी सुरू केली आहे.