न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ फेब्रुवारी २०२०) :- छावा मराठा संघटनेचा विस्तार करण्याच्या दृष्टीने पुणे आणि पिंपरी चिंचवड शहर परिसरातील पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात येत असून, बोपखेल गावठाण व अखिल विश्रांतवाडीच्या अध्यक्षपदी विकी शिंदे यांची, तर पुणे उपशहर अध्यक्षपदी कौशल सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली.
नुकतीच संघटनेची खडकी येथे बैठक संपन्न झाली. या बैठकीत संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विलासभाऊ पांगारकर, पुुणे जिल्हाध्यक्ष व कोकण संपर्कप्रमुख रामभाऊ जाधव यांनी ही घोषणा केली. त्यांच्या हस्ते शिंदे आणि सोनवणे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश सचिव मयूर पांगारकर, पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन गवांडे पाटील, अखिल शिवाजीनगरचे अध्यक्ष शुभम गवळी, खडकी कॅन्टोन्मेंट विभागाध्यक्ष विनायक तंबी, विनोद वाघ, विनोद वाडेकर, रोशन पोटे, सोन्या गोसावी, ओमकार वाळके, मयुरेश सोनवणे, हृतिक भूपत्तीवार, मुकेश ठाकूर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना रामभाऊ जाधव यांनी सांगितले, की समाजात लोकांवर होणार्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी छावा मराठा संघटना कार्यरत आहे. अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार, अवैध धंदे, नागरी समस्या या विरोधात आवाज उठवणे, हे संघटनेचे उद्दिष्ट आहे
विलासभाऊ पांगारकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले, की संघटनेत इमानदारीने व निःस्वार्थीपणे काम करणाऱ्या, तसेच अन्याय, अत्याचाराच्या विरोधात ठाम भूमिका घेणाऱ्यांनीच यावे.















