न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ फेब्रुवारी २०२०) :- चिखलीतील गणेश हौसिंग सोसायटी परिसरातील गट नं. १५१९ व १५२० मध्ये अनधिकृत पत्राशेडचे बांधकाम आहे. त्यामुळे नागरिकांना वहिवाटीसाठी अडथळा निर्माण होत आहे. स्थानिक नागरिकांच्या तक्रारी वाढल्यामुळे काही दिवसांपूर्वीच पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्तांकडे याबाबत सुनावणी झाली.
या अनुषंगाने स्थानिक नगरसेवक व प्रभागातील नागरिक यांच्या शिष्टमंडळाने नुकतीच महापालिकेचे आयुक्त हर्डीकर यांची भेट घेतली. गणेश हौसिंग सोसायटी परिसरातील रस्ता हस्तांतरणाचा प्रलंबित प्रश्न, रस्त्यावरील अनधिकृत बांधकाम हटविणे, रस्त्याचे डांबरीकरण करणे या कामांची कार्यवाही व्हावी यासाठी निवेदन दिले.
या शिष्टमंडळात स्थनिक नगरसेवक प्रवीण भालेकर, संगीता ताम्हाणे, पंकज भालेकर, सामाजिक कार्यकर्ते रावसाहेब थोरात, प्रभाकर ताम्हाणे, अण्णा ससाने, प्रविण पाटील, केशव येमले, महेन्द्र सिंह शेखावत आदी उपस्थित होते.















