न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ फेब्रुवारी २०२०) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका जनगणना २०२१ साठी मूळ प्रगणक गट कायम ठेवून उपगट तयार करणेकामी आज आचार्य अत्रे रंगमंदिर, पिंपरी येथे कार्यशाळेचे आयोजन केले होते.
या आयोजित कार्यशाळेत अतिरिक्त आयुक्त तथा शहर जनगणना अधिकारी अजित पवार, सहाय्यक आयुक्त आशादेवी दुरगुडे, चंद्रकांत इंदलकर, अण्णा बोदडे, संदिप खोत, मनोज लोणकर, सहशहर अभियंता श्रीकांत सवणे, कार्यकारी अभियंता तथा समन्वयक शिरिष पोरेड्डी, कार्यकारी अभियंता संजय घुबे, प्रशांत पाटील, प्रदिप पुजारी, क्षेत्रिय अधिकारी प्रभावती गाडेकर, सीताराम बहुरे, प्रशासन अधिकारी मुकेश कोळप, जनसंपर्क अधिकारी रमेश भोसले तसेच वहुसंख्येने कार्यकारी अभियंता, उपअभियंता, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक आदि मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सहाय्यक आयुक्त तथा मास्टर ट्रेनर अण्णा बोदडे यांनी केले व उपगट करण्याची कार्यपद्धती जनगणना समन्वयक तथा कार्यकारी अभियंता शिरिष पोरेड्डी यांनी उपस्थितांना सांगितले.















