- शिवसेना भोसरी विधानसभा व निलेश मुटके मित्र परिवाराच्या वतीने अपंग विद्यार्थ्यांनी सिनेमागृहात पहिला ‘तानाजी’ चित्रपट..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ फेब्रुवारी २०२०) :- छत्रपती शिवाजी महाराजांचे खास जवळचे सरदार तानाजी मालुसरे यांची आज मंगळवार (दि. ४) रोजी ३५० वी पुण्यतिथी आहे. आजच्या दिवशी म्हणजेच (दि. ४ फेब्रुवारी १६७०) रोजी तानाजी मालुसरे यांनी पुण्याजवळ असणारा कोंढाणा किल्ला जिंकला. ‘आधी लग्न कोंढाण्याचे मग माझ्या रायबाचे’ ही घोषणा सार्थ ठरवीत आपले आद्य कर्तव्य पार पाडले.
छत्रपतींच्या या महान मावळ्याच्या ३५० व्या पुण्यतिथीनिमित्त शिवसेना, भोसरी विधानसभा व निलेश मुटके मित्र परिवार यांच्या वतीने निगडीतील अपंग विद्यालयातील विद्यार्थ्यांना स्पाइन रोड येथील कार्निवल सिनेमागृहात ‘तानाजी द अनसंग वारीअर’ हा चित्रपट दाखविण्यात आला.
विद्यार्थ्यांना तानाजी मालुसरे यांच्या आयुष्यात अनेक आव्हानांना तोंड देत त्यांनी पराक्रम केले. या आठवणी विद्यार्थ्यांमध्ये जागृत व्ह्यायात हा उद्देश सफल व्हावा यासाठी हा चित्रपट दाखविण्यात आला, असे भोसरी विधानसभा समन्वयक प्रा. दत्तात्रय भालेराव यांनी सांगितले.
या प्रसंगी शिवसेना जिल्हा उपप्रमुख निलेश मुटके, भोसरी विधानसभा समन्वयक प्रा. दत्तात्रय भालेराव, विभाग प्रमुख विश्वनाथ टेमगिरे, रामदास गाढवे, संदीप टोके, दीपक सोनवणे, राजेंद्र खोसे, धनेश गांजवे, अभिजीत कसाळ, निवृत्ती अमुप, संभाजी शिंदे, राहुल बांगर, अक्षदा शेळके आदी शिवसैनिक उपस्थित होते.















