न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ फेब्रुवारी २०२०) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्रभाग क्रमांक १९ मधील एम्पायर इस्टेट, चिंचवड येथे संत मदर तेरेसा उड्डाणपुलावर चढणे व उतरणे कारणेसाठी तयार करण्यात आलेल्या रॅम्पचा उद्घाटन समारंभ उद्या शुक्रवारी (दि. ०७) रोजी महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते सकाळी १०.३० वा. संपन्न होणार आहे.
हा उद्घाटन समारंभ आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, खासदार अमर साबळे, खासदार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, संग्राम थोपटे आमदार आण्णा बनसोडे, उपमहापौर तुषार हिंगे, स्थायी सभापती विलास गडिगेरी, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते विठठल ऊर्फ नाना काटे, अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे, आयुक्त श्रावण हर्डीकर या मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
याप्रसंगी विधी समिती सभापती अश्विनी बोबडे, शहर सुधारणा समिती सभापती राजेंद्र लांडगे, महिला व बाल कल्याण समिती सभापती निर्मला कुटे, मनसे गटनेता सचिन चिखले, अपक्ष आघाडी गटनेता कैलास बारणे, शिक्षण समिती सभापती मनिषा पवार, जैव विविधता व व्यवस्थापन समिती सभापती उषा मुंढे, शिवसेना गटनेता राहुल कलाटे, अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, ब प्रभाग अध्यक्षा करुणा चिंचवडे, क प्रभाग अध्यक्षा यशोदा बोईनवाड, ड प्रभाग अध्यक्ष शशिकांत कदम, इ प्रभाग अध्यक्षा सुवर्णा बुर्डे, फ प्रभाग अध्यक्षा योगिता नागरगोजे, ग प्रभाग अध्यक्षा अर्चना बारणे, ह प्रभाग अध्यक्ष अंबरनाथ कांबळे, नगरसदस्य शैलेश ऊर्फ शैलेंद्र मोरे, शितल ऊर्फ विजय शिंदे, नगरसदस्या जयश्री गावडे, कोमल मेवानी, अतिरिक्त आयुक्त १ संतोष पाटील, अतिरिक्त आयुक्त २ अजित पवार उपस्थित राहणार आहेत.