- १२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण..
- आ. महेश लांडगे यांच्याकडून शितोळे दाम्पत्यांच अभिनंदन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २८ ऑक्टोबर २०२६) : श्रद्धा, भक्ती आणि जिद्दीच्या जोरावर भोसरीतील नथूमामा सखाजी शितोळे आणि शांताबाई नथू शितोळे या दाम्पत्याने दुचाकीवरून तब्बल ११ हजार किलोमीटरचा प्रवास करीत देशातील १२ ज्योतिर्लिंगांची यात्रा पूर्ण केली. त्यांच्या या भक्तिमय प्रवासाचे भोसरीत भोसरी युवा प्रतिष्ठान आणि समस्त ग्रामस्थांच्या वतीने उत्साहात स्वागत करण्यात आले.
देशाच्या विविध भागांत असलेल्या ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेण्यासाठी शितोळे दाम्पत्याने दुचाकीवरून प्रवास केला. लांबचे अंतर, बदलते हवामान आणि प्रवासातील आव्हानांवर मात करत त्यांनी आपला संकल्प पूर्ण केला. त्यांच्या या जिद्दीचे आणि अढळ श्रद्धेचे परिसरातून कौतुक होत आहे.
आमदार महेश लांडगे यांनी शितोळे दाम्पत्याचे अभिनंदन केले. त्यांच्या प्रवासातून श्रद्धा, साहस, परस्परविश्वास आणि ध्येयपूर्तीची प्रेरणा मिळते, असे त्यांनी सांगितले. या दाम्पत्याच्या यशामुळे भोसरीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.


















