न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० फेब्रुवारी २०२०) :- हिंगणघाटमधील पीडित प्राध्यपिकेच्या मृत्युस जबाबदार असणाऱ्या आरोपींना त्वरित फाशी देण्यात यावी, यासाठी शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने उद्या मंगळवारी (दि. ११) रोजी पिंपरीतील मोरवाडी भाजप कार्यालयासमोर सकाळी ११.१५ वा. जाहीर निषेध करण्यात येणार आहे.
यावेळी सर्व कार्यकर्ते, बंधु-भगिनी यांनी बहुसंख्येने व वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन भाजप शहराध्यक्ष व आ. महेश लांडगे यांनी प्रसिद्धीपत्रका द्वारे केले आहे.