न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० फेब्रुवारी २०२०) :- नागरिकांनी सार्वजनिक वाहतूकीचा वापर करण्याच्या उद्देशाने पीएमपीएलने आज १८०९ बस संचलनात आणत ” बस डे ‘ हा उपक्रम राबविला आहे.
या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद देत पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी पीएमपी बसने प्रवास केला. नागरिकांनी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याचे आवाहनही यावेळी महापौर माई ढोरे यांनी केले.