न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ फेब्रुवारी २०२०) :- कार किंवा बसने पुणे ते शिर्डी या प्रवासाला ५ ते ६ तास लागतात. मात्र, हा प्रवास आता ‘ब्लेड इंडिया’ या कंपनीने अधिक सुखकर बनवला आहे. ‘ब्लेड इंडिया’ने पुणे ते शिर्डी हेलिकॉप्टर सेवा सुरु केली आहे. हा हेलिकॉप्टर प्रवास ५० मिनिटांचा आहे.
एसी हेलिकॉप्टरमध्ये बसून निसर्गाला न्याहाळत नागरिक या प्रवासाचा लाभ घेऊ शकतात. मात्र, त्यासाठी १५ हजार रुपये खर्च करण्याची तयारी ठेवावी लागणार आहे. पण जर ऑफर सुरू असताना ही सेवा नागरिकांनी घेतली तर हा प्रवास १२ हजारात करता येणं शक्य आहे.


















