न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ फेब्रुवारी २०२०) :- पिंपरी चिंचवड शहर शिवसेना आयोजित आकुर्डीतील शिवसेना भवन येथे शनिवारी (दि. ८) रोजी माहितीचा अधिकार ही कार्यशाळा संपन्न झाली. माहितीचा अधिकार-२००५ या विषयावर सविस्तर चर्चा व प्रशिक्षणासाठी पिंपरी चिंचवड शहरातील सर्व शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांसाठी एक दिवसीय माहिती अधिकार कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
“हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे प्रशिक्षण शिबिर” या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत शिवसेना शहरप्रमुख योगेश बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
या माहितीचा अधिकार कार्यशाळेसाठी महिती अधिकार तज्ञ अॅड. अजित पुजारी हे प्रशिक्षक म्हणून उपस्थित होते. अजित पुजारी यांनी अगदी सोप्या भाषेमध्ये शिवसैनिकांना माहिती अधिकार कायदयाची माहिती सांगितली. माहितीचा अधिकार कायदा प्रत्येक नागरिकांसाठी कसा उपयोगाचा आहे आणि त्याचा प्रशासनात पारदर्शकता आणण्यासाठी कसा वापर करायचा याचे तांत्रिक प्रशिक्षण त्यांनी या कार्यशाळेत दिले.
या प्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमूख गजानन चिंचवडे, महिला शहरसंघटिका उर्मिलाताई काळभोर, सुनिता चव्हाण, शिल्पा आनपण, कामिनी मिश्रा, प्रतिक्षा घुले, मातोश्री सामाजिक संस्थेचे अध्यक्ष गणेश आहेर, आधिकराव भोसले, गोरख पाटील, नरसिंग माने, बाळासाहेब शिरसाठ, राहुल पलांडे, अक्षय घटकार,मारूती म्हस्के,दत्ता गिरी, विशाल चव्हाण,मूकेश चौकेकर, मनोहर कनाडे, प्रवीण पाटील, रितेश उत्तरवार आदी शिवसैनिक उपस्थित होते.
शिवसेना जिल्हा प्रमूख गजानन चिंचवडे व महिला शहरसंघटिका उर्मिलाताई काळभोर यांनी या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी रविकिरण घटकार व त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक केले व भविष्यात अशाच प्रकारच्या कार्यशाळा आणखी विस्तृत पातळीवर आयोजित कराव्या अशा सूचना दिल्या.
सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन विभागप्रमुख गोरख पाटील यांनी केले.


















