न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ फेब्रुवारी २०२०) :- पिंपरी चिंचवड सी ए शाखेला दि इन्स्टीट्य़ुट ऑफ चार्टर्ड अकौंटंन्टस ऑफ इंडिया (आयसीएआय) तर्फे राष्ट्रीय स्तरीय “द्वितीय बेस्ट ब्रॅंच विद्यार्थी संघटना, तसेच वेस्टर्न रिजन तर्फे “बेस्ट ब्रॅंच ऑफ आयसीएआय आणि बेस्ट ब्रॅंच ऑफ विद्यार्थी संघटना पुरस्कार २०१९” आयसीएआय च्या वतीने दिल्ली येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.
लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय राज्य वित्त मंत्री अनुराग ठाकुर,आयसीएआयचे राष्ट्रीय अध्यक्ष सीए प्रफुल्ल छाजेड यांच्या हस्ते“द्वितीय बेस्ट ब्रॅंच- विद्यार्थी संघटना(राष्ट्रीय स्तर २०१९) हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आणि “बेस्ट ब्रॅंच ऑफ आयसीएआय आणि बेस्ट ब्रॅंच ऑफ विद्यार्थी संघटना पुरस्कार २०१९” पश्चिम विभागीय अध्यक्षा सीए प्रीती सावला, उपाध्यक्ष उमेश शर्मा, सचिव सीए राकेश अलसी, सीए यशवंत कासार, सीए आनंद जाखोटिया यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष सीए संतोष संचेती, उपध्यक्षा सीए सिमरन लीलवानी,सचिव सी ए पंकज पाटनी, खजिनदार सी ए सचिन बन्सल , विद्यार्थी सीए संघटनेचे अध्यक्ष सीए विजयकुमार बामने , सीए चंद्रकांत काळे आणि कार्यकारी सदस्य सीए शैलेश बोरे यांनी पुरस्कार स्विकारला.
पिं. चिं. सीए शाखेचे अध्यक्ष सी ए संतोष संचेती म्हणाले कि, राष्ट्रीय परिषद, गुंतवणूकदार जनजागृती कार्यक्रम, जीएसटी कार्यशाळा,चर्चा सत्र, प्रमाणित अभ्यासक्रम , महिला सक्षमीकरण , मतदान जनजागृती कार्यक्रम, विद्यार्थ्यांसाठी आर्टिकल्स प्लेसमेंट प्रोग्रॅम, कॅम्पस प्लेसमेंट , करिअर मार्गदर्शन कार्यक्रम ,विविध खेळ, औद्योगिक सहल, वृक्षारोपण ,रक्तदान शिबीर, आंतरराष्ट्रीय योगा दिवस, सीए दिवस विविध कार्यक्रम आणि इतर समाज उपयोगी उपक्रम वर्षभर राबविल्याची दखल घेऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आल्याचे सांगितले.


















