न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ फेब्रुवारी २०२०) :- श्री स्वामी समर्थ अन्न छत्र मंडळ अक्कलकोट द्वारा श्री स्वामी समर्थ महाराज पालखी परिक्रमा सुरु असून शुक्रवार दिनांक 21 फेबुवारी 2020 रोजी श्री स्वामी समर्थ महाराज मंदिर शिवतेजनगर चिंचवड येथे पालखी मुकामी येत आहे.
यावेळी सायंकाळी 05 वाजता महाबली चौक शाहूनगर ते शिवसाई चौक येथून पालखीची मिरवणूक. 06 वाजता श्री स्वामी समर्थ मंदिर येथे आगमन. 07 वाजता पूजा, नैवेद्य, आरती रात्री 07 ते 09.30 पर्यंत दर्शन, भोजन, रात्री मुक्काम. तसेच दुसऱ्या दिवशी शनिवार दिनांक 22 फेब्रुवारी 2020 रोजी पहाटे 05.30 वाजता अभिषेक, 08.30 वाजता पालखी प्रस्थान.
या पालखी दर्शन सोहळ्यासाठी परिसरातील स्वामी भक्तांनी मिरवणूकी मध्ये सहभागी होऊन स्वामींच्या दर्शनाचा लाभ घ्यावा असे आव्हान श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष व माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे यांनी केले आहे.