न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० फेब्रुवारी २०२०) :- रुपीनगर तळवडे भागात विज बिल घेणाऱ्या व वाटप करणाऱ्या ठेकेदाराच्या अनागोंदी कारभाराबाबत शिवसेना युवा सेना शाखा रुपीनगर शाखेच्यावतीने अतिरिक्त कार्यकारी अभियंता मिलिंद चौधरी साहेब यांना घेराव घालून निवेदन देण्यात आले. पुढील गुरुवारपर्यंत मेसर्स अलबद एजन्सी यांना काम बंद करण्याचा आदेश न दिल्यास उपविभागीय कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा देण्यात आला.
रुपीनगर तळवडे भागात विज बिल उशिरा आल्यामुळे त्याचा नाहक त्रास सामान्य वीज ग्राहकास होत आहे. विज बिल भरण्याची शेवटची तारीख उलटून गेल्यानंतर विज बिल वाटप केले जाते ते तसेच काही वेळेस मिटर रिडींग सुद्धा घेतले जात नाही तरी आपण संबंधित एजन्सीवर कारवाई करावी तोपर्यंत शिवसेना शाखा रुपीनगर तळवडे भागातील मिटर रिडींग घेऊन देणार नाही व थकबाकी वसुली सुद्धा करून देणार नाही, असा इशारा अति. कार्यकारी अभियंता मिलिंद चौधरी यांना देण्यात आला.
या प्रसंगी विद्युत सनियंत्रण समिती पुणे जिल्ह्याचे सदस्य संतोष सौंदणकर, शाखाप्रमुख नितीन बोंडे, सतीश मरळ, अमित शिंदे, राहुल पिंगळे, सुनील समगिर, प्रवीण पाटील, अमोल मोरे, महेश थणंगे, किशोर शिंदे, दयानंद भालेकर, गणेश इंगवले, रमेश पाटोळे, सहदेव चव्हाण तसेच पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.











