न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० फेब्रुवारी २०२०) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज समाज प्रबोधन पर्वानिमित्त भक्ती शक्ती चौक निगडी येथे मराठ्यांची गौरवगाथा हे छत्रपती शिवाजी महाराज तसेच छत्रपती संभाजी महाराज यांच्या जिवनावर आधारीत महानाट्य सादर करण्यात आले. या महानाट्यात २५० कलाकार, जिवंत घोडे, उंट, बैलगाडी तसेच शाही तोफांसह सहभागी झाले होते.
या कार्यक्रमास महापौर उषा उर्फ माई ढोरे, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, नामदेव ढाके, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने, म.न.से. गटनेते सचिन चिखले, अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, नगरसदस्य अमित गावडे, नगरसदस्या सुमन पवळे, अनुराधा गोरखे, अतिरिक्त पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलिस उपायुक्त स्मिता पाटील, सहाय्यक पोलिस आयुक्त रामचंद्र जाधव, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, वरिष्ठ पोलिस निरिक्षक गणेश जवादवाड, अरदवाड यांच्या सहित शिवजयंती उत्सव समितीचे प्रविण पाटील, जीवन बोराडे, सागर तापकीर, प्रतिक इंगळे, निलेश शिंदे, हेमंत शिर्के, अभिषेक म्हसे, दत्तात्रय शिंदे, विनायक जगताप, स्वप्निल शिंदे, संतोष पाचपुते, प्रशांत जाधव, दादासाहेब पाटील, अतुलजी वर्पे, राजेंद्र देवकर, राजू पवार, विनायक जगताप, किरण जंजाळे, सचिन आल्हाट, ज्ञानेश्वर लोभे, अक्षय गोंदिल, विनायक जाधव, सतीश काळे, जालिंदर खतकर, विष्णू नानेकर, जयराम नानेकर, संतोष बदाडे, सतेज परब, सौरभ साबळे यांच्यासह आदी उपस्थित होते.
महानाट्य पाहण्यासाठी शहरातील प्रेक्षकांची अभुतपुर्व गर्दी झालेली होती. महानाट्याचे सादरीकरण लोणावळा येथील अरुणोदय प्रोडक्शनचे लेखक निर्माते दिग्दर्शक प्रविण देशमुख यांनी केले. तर अजय शेलार, गणेश कोतवाल आणि रविंद्र बेंडगर यांनी महानाट्यासाठी विशेष सहाकार्य लाभले.












