न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी :- काळेवाडीतील तापकीरनगर येथील कै. हनुमंतराव गंगाराम तापकीर प्रतिष्ठान व कै. शंकरराव हनुमंतराव तापकीर यांच्या नवव्या पुण्यस्मरण दिनानिम्मित शनिवार (दि. २७) रोजी ह.भ.प. माउली महाराज पठाडे (प्रती इंदुरकर) यांचा सुश्राव्य कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
श्रीमती. उल्हासाबाई हनुमंत तापकीर यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार असून, परिसरातील नागरिकांकरीता मोफत आरोग्य तपासणीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी नेत्र तपासणी, टी. टी. इंजेक्शन, चष्मे वाटप, स्री रोग तपासणी, मोफत औषध वाटप, जेष्ठ नागरिकांकरीता विविध आरोग्य तपासण्या करण्यात येणार आहेत. यावेळी डॉ. जाधव, डॉ. प्रशांत सोलापुरे, डॉ. रश्मी पांचाळ, डॉ. काजल नतंगी या तज्ञ डॉक्टरांचे उपस्थिती राहणार असल्याचे आयोजक स्वी. नगरसेवक विनोद तापकीर, उद्योजक निलेश तापकीर यांनी सांगितले.
यावेळी आमदार लक्ष्मण जगताप, प्रगतशील शेतकरी ज्ञानेश्वर तापकीर, स्वी. नगरसेवक विनोद तापकीर, उद्योजक निलेश तापकीर, उद्योजक नविन तापकीर, राम तापकीर, हर्षल तापकीर, विराज तापकीर आदी उपस्थित राहणार आहेत.















