- ‘ पाऊसपाड्या ‘ ही एकांकिका ठरली अव्वल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ फेब्रुवारी २०२०) :- चिंचवड येथील प्रा . रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आयोजित राम गणेश गडकरी करंडक राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धेत पाच पारितोषिके मिळवून नाशिक येथील सौंदर्य निर्मित थिएटर्स संस्थेने गडकरी करंडकावर नाव कोरले. त्यांनी सादर केलेली ‘ पाऊसपाड्या ‘ ही एकांकिका अव्वल ठरली.
राजारामबापू कॉलेज ऑफ टेक्नोलॉजी ( इस्लामपूर ) यांनी सादर केलेल्या एक्सपायरी डेट ‘ या एकांकिकेला दुसरा तर , ‘ रंगपंढरी ‘ | ( पुणे ) यांनी सादर केलेल्या ‘ बिनविरोध ‘ या एकांकिकेला तिसरा क्रमांक मिळाला.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ( पिंपरी – चिंचवड ) , पिंपरी – चिंचवड कलारंग प्रतिष्ठान , चंद्रकला किशोरीलाल गोयल प्रतिष्ठान यांच्यातर्फे आयोजित गडकरी करंडक एकांकिका स्पर्धा नुकतीच उत्साहात पार पडली. स्पर्धेत राज्यभरातून २५ संघांनी सहभाग घेतला. एकांकिकांतून हाताळलेले वैविध्यपूर्ण विषय, वैशिष्ट्यपूर्ण नेपथ्य, प्रकाशयोजना, उत्तम अभिनय यांचा संगम अनुभवण्यास आला.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे यांच्या हस्ते झाले. मधू जोशी, भाऊसाहेब भोईर, दीपाली शेळके, सुरेश धोत्रे, अमित गोरखे, कृष्णकुमार गोयल, परीक्षक सुनील देशपांडे, नंदकुमार सावंत, फलटणकर उपस्थित होते. परीक्षक परिचय नरेंद्र आमले यांनी केले. सुहास जोशी यांनी सूत्रसंचालन केले. किरण येवलेकर यांनी पारितोषिक वाचन तर, गौरी लोंढे यांनी आभार मानले. राजेंद्र बंग, महेश लाकाळ, संतोष शिंदे यांनी संयोजन व सहकार्य केले.















