न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ फेब्रुवारी २०२०) :- महावीर अन्न सेवा आणि विहार सेवेसाठी पूना विहार समूह यांना नुकतीच पुणे येथील कार्यक्रमात मारुती व्हॅन भेट देण्यात आली. शिल्लक अन्न संकलन आणि वितरणासाठी ही व्हॅन देण्यात आली.
लोटस ग्रुपतर्फे उद्योजक संतोष कर्नावट तसेच राहुल लुंकड आणि जितेंद्र लुंकड यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम घेण्यात आला. श्री अखिल भारतीय श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्सचे राष्ट्रीय अध्यक्ष पारस मोदी यांच्या हस्ते विहार सेवक राजेश भंडारी, डॉ. सुरेंद्र ओसवाल यांच्याकडे ही व्हॅन सपूर्द करण्यात आली.
यावेळी आकुर्डी – निगडी प्राधिकरण संघाचे अध्यक्ष जवाहर मथ्था, कार्याध्यक्ष सुभाष ललवाणी, कोषाध्यक्ष मोतीलाल चोरडिया, विश्वस्त सूर्यकांत मुथीयान, मदन कांकरिया, मंत्री प्रकाश मुनोत, राजेंद्र छाजेड, नेनसुख मांडोत, विलास लोढा, सुभाष सुराणा, शशिकला सुराणा, लता मुथियान, अशोक मंडलेचा, संजय बाफना, राहुल देसरडा, राहुल धोका, प्रवीण शिश्रीमाळ आदी उपस्थित होते.















