न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ फेब्रुवारी २०२०) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने सोमवारी (दि. २४) रोजी मधुकर पवळे उड्डाणपूलाखाली, निगडी बस स्टॉप, महाराणा प्रताप उद्यान, LIC ऑफिस, यमुनानगर निगडी, SPM School, टन्ना हॉस्पिटल आदी ठिकाणी अतिक्रमणावर कारवाई केली.
तसेच कार्यकारी अभियंता राजेंद्र राणे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण निर्मूलन कारवाई करीत लोखंडी टपरी, लोखंडी काऊंटर, लोखंडी स्टॅन्ड, हातगाडी, मोटारी सह रसवंती गुऱ्हाळ, प्लॅस्टिक खुर्च्या, जाहिरात फलक आदी साहित्य जप्त केले.
तसेच या परिसरात फुटपाथवर अनधिकृतरीत्या बांबू, चटाई, बारदान, पत्रा आदीच्या सहाय्याने उभारलेले चार शेड निष्कासित केले. ही कारवाई पथक क्रमांक ३ द्वारे करण्यात आली असून, या कारवाईमध्ये उपअभियंता बोकरे, बीट निरीक्षक केतकी कुलकर्णी, महाजन, अतिक्रमण निरीक्षक सतीश लांडगे, सदाशिव सुभेदार, विभाग प्रमुख सुरेश कोंढरे, मनपाचे पोलीस, होमगार्ड, ठेकेदारकडील ४ डंपर, १ क्रेन ३ मजुर यांचा समावेश होता. वेळोवेळी कारवाई करून देखील विक्रेते पुन्हा पुन्हा अतिक्रमणे करत असल्यामुळे या ठिकाणी वारंवार कारवाई केली जाईल, असे कोंढरे यांनी सांगितले.















