न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ फेब्रुवारी २०२०) :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चऱ्होली-वडमुखवाडी (अ) शाखेच्या शाखाप्रमुखपदी सुधीर भालेराव यांची निवड करण्यात आली आहे.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या आशीर्वादाने व मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले व भोसरी विधानसभा अध्यक्ष अंकुश तापकीर यांच्या आदेशानुसार बुधवारी (दि. २६) रोजी त्यांची निवड करण्यात आली.
भोसरी विधानसभा अध्यक्ष अंकुश तापकीर यांच्या हस्ते भालेराव यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले. यावेळी मनसेचे इतर कार्यकर्ते उपस्थित होते.















