न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ फेब्रुवारी २०२०) :- शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या पदाधिकाऱ्यांची नुकतीच कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेनेचे प्रदेशाध्यक्ष उदय दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली व पुणे जिल्हा अध्यक्ष महेश केदारी तसेच शिवसेनेचे महाराष्ट्र वाहतूक सेनेचे शहराध्यक्ष संजय यादव यांच्या हस्ते पदांचे वाटप करण्यात आले.
या कार्यकारिणीत शहर सरचिटणीसपदी रविराज मांडवे, प्रसिद्धी प्रमुखपदी गुरुनाथ शिनगारे, चिंचवड विधानसभा अध्यक्षपदी दत्ता जाधव, पिंपरी विधानसभा समन्वयकपदी अय्याझ अन्सारी, पिंपरी विधानसभा संघटकपदी विनय साळवी, चिंचवड विधानसभा संघटकपदी अजय भोसले, भोसरी विधानसभा संघटकपदी जय अलकुंटे, पिंपरी विभाग अध्यक्ष अमित परदेशी, पिंपरी विभाग अध्यक्ष अरबाज शेख, भोसरी विभाग अध्यक्षपदी रोहन चोपडे
यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तसेच उर्वरीत कार्यकारिणी लवकरच जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती शिवसेनेचे महाराष्ट्र वाहतूक सेनेचे शहराध्यक्ष संजय यादव यांनी दिली.















