- महापालिका सोमवारी स्वीकारणार इच्छुक उमेदवारांचे अर्ज…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ फेब्रुवारी २०२०) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी निवड पुढील शुक्रवारी (दि. ६) करण्यात येणार आहे. त्यासाठी सोमवारी (दि. २) उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत, अशी माहिती नगरसचिव उल्हास जगताप यांनी गुरुवारी (दि. २७) दिली.
समितीचे ८ सदस्य शनिवारी (दि. २९) निवृत्त होत आहेत. या नव्या आठ सदस्यांची निवड बुधवारी (दि. २६) करण्यात आली आहे. समिती अध्यक्षाची निवड पुढील शुक्रवारी दुपारी बाराला पालिका भवनातील मधुकरराव पवळे सभागृहात आयोजित केलेल्या विशेष सभेत केली जाणार आहे.
पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली. ही निवड होणार आहे. त्यापूर्वी सोमवारी (दि. २) दुपारी ३ ते सायंकाळी ५ या वेळेत अध्यक्षपदाच्या उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जाणार आहेत. त्या दिवशी अध्यक्षपदाचे नाव स्पष्ट होणार आहे. भोसरी की चिंचवड विधानसभा मतदार संघातून कोणत्या सदस्याच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडते, याची उत्सुकता पालिका वर्तुळात सुरु आहे.















