न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ मार्च २०२०) :- वाहन चालविताना मोबाईलवर बोलणाऱ्या अथवा मेसेज पाहत जाणा-या वाहनाचालकांमुळे अपघाताचा धोका निर्माण होत आहे. यंदाच्या वर्षातील पहिल्या दोन महिन्यात जवळपास साडेतीन हजार वाहनांवर शहर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे.
वाहतूक पोलिसांनी जानेवारी महिन्यात २ हजार ६६२ वाहनचालकांवर कारवाई केली तर, फेब्रुवारीमध्ये जवळपास दीड हजार वाहनांवर कारवाई केली आहे. त्या माध्यमातून साडेसात लाखाच दंड वसूल केला आहे.












