न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ मार्च २०२०) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने संभाजीनगर, चिंचवड येथील बर्ड व्हॅली उद्यानात लेझर शो प्रकल्प राबविण्यात येणार आहे.
यासाठी महापालिकेच्या वतीने दहा कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. या कामामध्ये आंतरराष्ट्रीय देशी बनावटीच्या साहित्यांची अट घालण्यात आली आहे. मात्र तरीही या प्रकल्पाची किंमत १० कोटी इतकीच आहे.
त्यामुळे यामध्ये गैरव्यवहार होण्याची शक्यता वर्तविल्या जात असतानाही स्थायी समितीने या विषयाला मंजुरी दिली आहे. संभाजीनगर येथील बर्ड व्हॅली उद्यानामध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने संभाजीनगर, चिंचवड येथील बर्ड व्हॅली उद्यानात लेझर शो प्रकल्प राबविण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेच्या वतीने दहा कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.















