न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ मार्च २०२०) :- शिरुर लोकसभा मतदारसंघातील प्रलंबित राष्ट्रीय महामार्ग रस्त्यांच्या कामासंदर्भात (दि. २ मार्च) केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी दिल्लीत विशेष बैठक बोलावली होती.
या बैठकीत मोशी ते राजगुरुनगर (रा. म. ६०) तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्ता, पुणे-नगर रस्ता यासह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. खासदार डॉ. कोल्हे यांनी उपस्थित केलेल्या सर्वच मुद्द्यांवर सकारात्मक प्रतिसाद देत केंद्रीयमंत्री गडकरी यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघातील रस्त्यांची कामांची टेंडर प्रक्रिया प्राधान्याने करण्याच्या स्पष्ट सूचना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
पुणे – नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील (रा. म. ६०) मोशी (इंद्रायणी नदी) ते राजगुरुनगर या टप्प्यातील रस्त्याच्या सहापदरीकरणाच्या कामाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार असून एप्रिल महिन्यात या कामाचे टेंडर निघणार असून यामुळे चाकण चौकातील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होईल, अशी माहिती खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिली.


















