न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ मार्च २०२०) :- गॅरेजमध्ये लागलेल्या आगीत दुरुस्तीसाठी आलेली दहा ते पंधरा वाहने जळून खाक झाली. ही घटना मंगळवारी (दि. ३) रात्री आकराच्या सुमारास केशवनगर, चिंचवड येथे घडली.
पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) विश्वजित खळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचवडकडून काळेवाडीच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर मदिना नावाने चारचाकी वाहनांचे गरज आहे. मंगळवारी रात्री अचानक गॅरेजमध्ये आग लागली.
घटनेची माहिती मिळताच अग्निशामकचे चार बंब आणि पोलिसांचा मोठा ताफा घटनास्थळी दाखल झाला. मात्र, तोपर्यंत दहा ते पंधरा वाहने जळून खाक झाली. तसेच, गॅरेजच्या नजीकचे फळांचे गोदामदेखील जळून खाक झाले. रात्री उशिरापर्यंत आग विझवण्याचे काम सरू होते. आग विझवताना सीएनजी गॅसचे स्फोट होत होते.


















