न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ मार्च २०२०) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने आज गुरुवारी (दि. ५) रोजी प्रभाग क्रमांक ९ मधील एचए कॉर्नर्स, यशवंत नगर, मगर स्टेडियम इत्यादी ठिकाणी अतिक्रमण हटाव कारवाई करीत साहित्य जप्त केले व ते मनपाच्या गोडाऊनमध्ये जमा केले.
यात टपरी, रसवंतीगृह, पत्रा शेडवर कारवाई करीत निष्कासित करण्यात आले. ही कारवाई सकाळी १०.३० ते १.३० या वेळेत झाली. ही कारवाई कनिष्ठ अभियंता, बीट निरीक्षक, अतिक्रमण निरीक्षक, मनपाचे पोलीस, ४ डंपर, १ क्रेन ठेकेदाराकडील मजुर यांनी केली, अशी माहिती प्रभारी प्रशासन अधिकारी सुरेश कोंढरे यांनी दिली.