न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ मार्च २०२०) :- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे येत्या सात मार्च रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्याआधी शिवसैनिक अयोध्येसाठी रवाना झाले आहेत.
गुरुवारी दुपारी कुर्ल्याच्या लोकमान्य टिळक टर्मिन्सहून शिवसैनिकांना घेऊन विशेष ट्रेन अयोध्येसाठी रवाना झाली आहे. महाविकास आघाडी सरकारला १०० दिवस पूर्ण झाल्यानिमित्त उद्धव ठाकरे अयोध्येत जाऊन प्रभू रामचंद्रांचे दर्शन घेणार आहेत.













