न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ मार्च २०२०) :- हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्म सोहळा आज काळेवाडी येथे मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. काळेवाडी शिवसेना पक्षाच्या वतीने शिवजन्माचा पाळणा, शिववंदना आणि महाप्रसाद असे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ‘जय भवानी जय शिवाजी’, ‘हर हर महादेव’ अशा गर्जनांनी अवघा आझाद चौक परिसर दुमदुमून गेला होता.
यावेळी शिवसेनेचे महापालिका गटनेते राहुल कलाटे, जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, शहरप्रमुख योगेश बाबर, माजी नगरसेवक अनंत कोऱ्हाळे, नगरसेवक विनोद नढे, दिलीप काळे, रोमी संधू, सामाजिक कार्यकर्ते एकनाथ मंजाळ, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष नरेंद्र माने, विभागप्रमुख अंकुश कोळेकर, गणेश वायभट, प्रदीप दळवी, आदिक भोसले, संजय नरळकर, गोरख पाटील, प्रजाक नढे, महादेव बिक्कड, नेताजी नखाते, हिरामण काळे, पद्माकर जांभळे, बाळासाहेब काळे, बाळासाहेब येडे, नितीन कुंजीर, सुरेश विटकर यांच्यासह शेकडो शिवसैनिक आणि ज्येष्ठ नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
शिवसेनेचे चिंचवड विधानसभा विभाग संघटक हरेश नखाते यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले होते. कार्यक्रमाच्या सुरवातीला सुजाता नखाते, मुक्ता पवार, वंदना वायभट, चंदा साळुंखे, मनीषा येडे, वनिता गवळी, शुभांगी पाटणकर, दीपाली नढे, मीना वरात आदी महिलांनी बालशिवबाचा पाळणा म्हणत शिवजन्माचे स्वागत केले. त्यानंतर शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
दरम्यान, जगभरात वेगाने पसरत चाललेल्या जीवघेण्या कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी जनजागृती करण्यात आली. डॉ. सुहास साळुंखे यांनी या रोगापासून स्वतःचा बचाव कसा करावा यासंदर्भात उपाययोजना सांगितल्या. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित नागरिकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.












