न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ मार्च २०२०) :- राज्यात करोनाबाधित रुग्णांची संख्या ३२ वर पोहोचली आहे. संसर्गजन्य आजार असलेल्या करोनाला प्रतिबंध घालण्यासाठी राज्य सरकारनं कठोर पावलं उचलण्यास सुरूवात केली आहे. याचा भाग म्हणून गर्दी होणारी ठिकाणं बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
याचंच पुढचं पाऊल म्हणजे सरकार करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी करोनाबाधित रुण्गांनं विलगीकरणास सहकार्य केलं नाही, तर नजरकैदेत ठेवण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली.
‘करोनाबाधित रुग्णांचं विलगीकरण करण्यात येत. १४ ते १५ दिवस या रुग्णांना स्वतंत्र ठेवण्यात येतं. त्यामुळे एकटं राहणं कंटाळवाण आहे. त्यामुळे काही रुग्ण पळूनही जातात. मात्र, करोनाबाधित रुग्ण सहकार्य करत नसेल, तर त्याला स्थानबद्ध करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर रुग्ण पळून जाऊ नये, म्हणून पोलीस बंदोबस्तही करण्यात आलेला नाही, अशी माहिती टोपे यांनी दिली.













