न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ मार्च २०२०) :- पिंपरी-चिंचवड शहरात सर्वाधिक करोनाबाधित आहेत. करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, म्हणून राज्य शासनाने शाळा, कॉलेज, जलतरण तलाव, जिम, मॉल्स आदी बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या व्यतिरिक्त कोणताही कार्यक्रम घेऊ नये असेही आदेश देण्यात आले आहेत. जेणेकरून गर्दी होणार नाही.
मात्र, आज पिंपरी-चिंचवडमध्ये भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांच्या कार्यकारणीची बैठक घेण्यात आली. याबैठकीला शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. करोनाचा संसर्ग वेगानं फैलावत असताना भाजपाच्या प्रदेशांकडूनच राज्य शासनाचा आदेश भंग केल्याचं दिसत आहे.













