न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ मार्च २०२०) :- “नागरिकांनी पॅनिक होऊ नका. आठवड्याच्या आवश्यक गोष्टी घरात आणून ठेवा. दुकानांमध्ये गर्दी करु नका. हे नियम दुकानदारांना सुद्धा लागू आहेत, विनाकारण दुकानात गर्दी करु नका. पिंपरी चिंचवडमध्ये १४४ (१) लागू करण्यात आलं आहे. पूर्ण संचारबंदी नसली तरी काही बंधन घातली आहेत,” या बंधनांचे जो कुणी उल्लंघन करेल त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
“पुणे शहरात एकूण १६ रुग्ण झाले. २७ जण निगेटिव्ह आहेत. रात्री विमानाने आलेल्या ९९ पैकी ७ जणांनी स्वतः त्रास होत असल्याचं सांगितलं आहे. त्यांना नायडूमध्ये पाठवलं आहे. तिथल्या डॉक्टरांना आवश्यकता वाटत असेल तर त्यांचे नमुने घेतले जातील आणि ते एनआयव्हीकडे पाठवले जातील. गेल्या २४ तासात नव्याने फक्त १ पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे”, असंही म्हैसेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
पुणे महापालिका आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या १२५ टीम सर्व्हे करत आहेत. यातून पुणे आणि आवश्यकता वाटल्यास इतर चार जिल्ह्यांना हा निधी दिला जाईल. आतापर्यंत १५८०३ घरांमध्ये सर्व्ह पूर्ण केला आहे, असं म्हैसेकर यांनी सांगितले.















