न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ मार्च २०२०) :- २२ लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ऑक्टोबर २०१७ ते १५ मार्च २०२० या कालावधीत आकुर्डी येथे घडली आहे.
असिक अशोक माटे (वय ३२, रा. लांडगेनगर, भोसरी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी चंद्रकांत आण्णा खैरे (वय ४४, रा. दापोडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांच्याकडून २१ लाख ९१ हजार १५२ रुपये किमतीची एस ई डब्ल्यू प्रेस मशीन विश्वासाने घेतली. फिर्यादी यांनी काही कालावधी नंतर मशिन मागितली असता ती देण्यास टाळाटाळ करुन फिर्यादी यांची फसवणूक केली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.















